नाशिक : गिरीश महाजनांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात राष्ट्रवादीचं जोडे मारो

05 Nov 2017 11:24 PM

दारूचा खप वाढवण्यासाठी ब्रँडला महिलेचं नाव देण्याचा सल्ला देणाऱ्या गिरीश महाजनांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी जोडा मारो आंदोलन केलं. गिरीश महाजनांच्या वक्तव्यामुळं समस्त महिला वर्गाचा अपमान झाला आहे. त्यामुळं त्यांनी माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनं केली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिकांनी शेलक्या शब्दात गिरीश महाजनांवर टीका केली.

LATEST VIDEOS

LiveTV