नाशिक: धार्मिक स्थळांचं अतिक्रमण हटवण्यास विरोध

08 Nov 2017 11:57 AM

नाशिक शहरातील 164 धार्मिक स्थळांचं अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईविरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात. अतिक्रमणं काढण्याच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी  नाशिक बंदची हाक दिलीये.  सर्वपक्षीय, सर्वधर्मीय नेत्यांनी या बंदला पाठिंबा जाहीर केलाय. त्यामुळे धार्मिक स्थळांचं अतिक्रमण काढण्याचा मुद्दा प्रशासनासाठी अडचणींचा ठरणार अस दिसतंय.

LATEST VIDEOS

LiveTV