नाशिक : समृद्धी महामार्ग रद्द करायचा असेल, तर शेतकऱ्यांनी लढा सर्वव्यापी करावा : राज ठाकरे

10 Nov 2017 12:33 PM

समृद्धी महामार्ग रद्द करायचा असेल तर सर्व शेतकऱ्यांनी संघटीत व्हा, हा लढा फक्त समृद्धी बाधित शेतकऱ्यांचा न ठेवता तो सर्वव्यापी करा. सरकारने हा लढा जिल्हा, तालुका, गावच नव्हे तर फक्त काही शेतकऱ्यांइतकाच हा लढा करून ठेवला. त्यामुळे इतर शेतकऱ्यांनी समोर येऊन समृद्धी बाधित शेतकऱ्यांना पाठिंबा द्यावा, असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांना केलं.  मनसेची भूमिका जाहीर केली नसली तरी, समृद्धी बाधित शेतकऱ्यांसाठी सर्व शेतकऱ्यांनी याप्रश्नी एकत्र यावे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.
राज ठाकरेंनी आज नाशिक जिल्ह्यातील समृद्धी महामार्गासाठी जमीन जाणाऱ्या पीडित शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

LATEST VIDEOS

LiveTV