नाशिक : भाज्यांचे दर गगनाला भिडले, नागरिक त्रस्त, शेतकरी मात्र सुखावला

30 Oct 2017 11:33 AM

नाशिकमधील किरकोळ बाजारात भाज्यांनी ऐंशी पार केली. तर कोथिंबीर, कांद्यानंतर आता टोमॅटोने विक्रमी भावाकडे वाटचाल सुरू केली. त्यामुळे दिवाळी नंतर शेतकऱ्यांची खरी दिवाळी साजरी होतांना दिसते.

नाशिक जिल्ह्यातील पिंपळगावच्या ठोक बाजारात टोमॅटो 50 रुपये किलोवर पोहचला आहे. गेल्या अनेक वर्षात टोमॅटोला पहिल्यांदा इतके अच्छे दिन आलेत तर कांदा 40 रुपये किलो तर कोथंबीर 150 रुपये जुडी झाली. या व्यतिरिक्त इतरही भाज्यांचे भाव गगनाला भीडलेत. तर किरकोळ बाजारात इतर भाज्याचे भाव 80 रुपयापर्यंत पोहोचले आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV