नाशिक : राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर, जमिनीवर बसून कार्यकर्त्यांशी संवाद

10 Nov 2017 01:33 PM

मुंबईतील मनसेच्या सात पैकी सहा नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानतंर, आता राज ठाकरे कार्यकर्ते, पदाधिकारी तसंच नागरिकांशी संवाद साधत आहेत. नाशिक दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंनी थेट जमिनीवर बसून कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

पक्षावर आलेलं मळभ दूर करण्यासाठी मनसे अध्यक्षांनी राज्यभर दौरा सुरु केला आहे. त्याचा भाग म्हणून राज ठाकरे गुरुवारी नाशिकमध्ये दाखल झाले. यावेळी राज यांनी कार्यकर्त्यांसोबत जमिनीवर बसून बातचीत केली.

LATEST VIDEOS

LiveTV