नाशिक : 25 रायफल, 19 पिस्तुलसह मोठा शस्त्रसाठा जप्त

15 Dec 2017 10:27 PM

मुंबई-आग्रा महामार्गावर पोलिसांनी केलेल्या तपासणीत एका बोलेरो गाडीत शस्त्रांचा खजिनाच सापडलाय.
चांदवडजवळच्या मंगरुळजवळ काल रात्री पोलिसांनी संशयित बोलेरो गाडी अडवली. तिची कसून तपासणी केली.
यावेळी गाडीतील गुप्त कप्प्यांमध्ये तब्बल 25 रायफली, 17 रिव्हॉल्वर्स, 2 विदेशी पिस्तुलं आणि 4 हजार 146 काडतुसं आढळून आली.
याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV