नाशिक : माणसातील देवदूत डॉ. सुहास कोटक यांच्याशी खास बातचीत

27 Dec 2017 11:18 PM

पचाराअभावी अपघातग्रस्तांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना आतापर्यंत तुम्ही पाहिल्या असतील, पण नाशिकमध्ये माणसातला देव दाखवणारी घटना समोर आली. रक्ताच्या थाऱोळ्यात पडलेल्या एका रुग्णाला रस्त्यावरुन जाणाऱ्या डॉक्टरांनी गाडी थांबवून वाचवलं. मंगळवारी रात्री पंचवटी परिसरात दोन दुचाकींचा भीषण अपघात झाला. आणि एका व्यक्तीच्या छाती आणि डोक्याला  जबर मार लागला. यावेळी रस्त्यावरुन जाणाऱ्या डॉक्टर सुहास कोटक यांनी आपली गाडी थांबवून रुग्णाला रस्त्यावरच ऑक्सिजन दिला. मात्र तोंडातून रक्त येत असल्यानं  ऑक्सिजन देणंही अवघड होत होतं. त्यामुळं त्यांनी ऑक्सिजन पंपाच्या मदतीनं शेवटपर्यंत उपचार केला. अखेर डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आलं, आणि हा रुग्ण वाचला. यानंतर पोलिसांच्या मदतीनं रुग्णाला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या कृत्यातून डॉक्टर सुहास कोटक यांनी रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीद खरं ठरवलं. याच सुहास कोटक यांच्याशी खास बातचीत

LATEST VIDEOS

LiveTV