नाशिक : यूट्यूबवर व्हिडीओ पाहून एटीएम फोडण्याचा प्रयत्न, दोन तरुण अटकेत

06 Dec 2017 11:15 PM

नाशकातल्या युवकांनी एटीएम लुटण्याची योजना आखली. धक्कादायक बाब म्हणजे एटीएम तोडण्याचे प्रशिक्षण युट्यूब वरुन घेतल्याचं समजतं आहे. किरण मोरे आणि अमित गवई अशी या दोघा चोरांची नावं आहेत. खाजगी कंपनीत कामाला असलेल्या दोघांनी कुलकर्णी गार्डन लगत असलेलं एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. स्थानिकांना संशय आल्याने पोलिसांनी माहिती दिली. घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी या दोघांना अटक केली.

LATEST VIDEOS

LiveTV