नवी मुंबई : पोलिस महासंचालक अर्धा तास वाहतूक कोंडीत, नाराजीनंतर कर्मचाऱ्यांच्या बदल्या

09 Nov 2017 02:54 PM

मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा फटका रोजच बसत असतो. त्याबाबतची तक्रार देखील करताना कोणी आढळत नाही. परंतु राज्याचे महासंचालक वाहतूक कोंडीत अडकल्याने 2 अधिकारी आणि 4 कर्मचाऱ्यांना मात्र चांगलाच फटका बसला. सूत्रांनी ही माहिती दिली. सायन-पनवेल महामार्गावर 31 ऑक्टोबरला राज्याचे पोलिस महासंचालक सतीश माथूर अर्धा तास अडकले होते. याबाबतची नाराजी त्यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांकडे व्यक्त केली. यावर आयुक्तांनी तात्काळ कारवाई करत दोन अधिकारी आणि 4 कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या.
कळंबोली वाहतूक विभागाचे साहाय्यक निरीक्षक वाघ यांची दंगल नियंत्रण कक्षात, बेलापूर वाहतूक वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहिते यांची बदली आयुक्तालयात करण्यात आली. तर चार कर्मचाऱ्यांच्या बदल्या रोडपाली मुख्यालयात करण्यात आल्या आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV