नवी मुंबई : ओव्हरहेड वायर तुटल्याने हार्बर मार्गावरील बेलापूर ते पनवेल वाहतूक ठप्प

26 Dec 2017 12:57 PM

हार्बर मार्गावरील बेलापूर ते पनवेल वाहतूक गेल्या दीड तासांपासून ठप्प आहे. दोन्हीही बाजूची वाहतूक बंद असल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. ओव्हरहेड वायर तुटल्याने ही वाहतूक बंद आहे. मात्र अजूनही काम झालं नसल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

उरण-बेलापूर मार्गाच्या कामासाठी गेल्या चार दिवसांपासून हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला होता. त्या काळातही प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. त्यात आता मेगाब्लॉक संपला तरी प्रवाशांचे हाल मात्र अजून संपलेले नाहीत.

LATEST VIDEOS

LiveTV