नवी मुंबई : अश्विनी बिद्रे बेपत्ताप्रकरणी संशयास्पद कार पोलिसांच्या ताब्यात

19 Dec 2017 08:36 PM

बेपत्ता महिला पोलीस अश्विनी बिद्रे गायब प्रकरणी अटकेत असलेले पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर यांनी वापरलेली कार ताब्यात घेण्यात आली आहे. अश्विनी बिद्रे यांचा घातपात करण्यासाठी सदर कार वापरण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. गेल्या 12 दिवसांपासून अभय कुरुंदकर पोलीस कोठडीत आहेत. तर अश्विनी बिद्रे या 11 एप्रिल 2016 पासून भाईंदरमधून बेपत्ता झाल्यात. दरम्यान, अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणी अटकेत असलेले अभय कुरुंदकर आणि राजू पाटील यांच्या पोलीस कोठडीत 19 डिसेंबरपर्यंत वाढ करण्यात आली.

LATEST VIDEOS

LiveTV