नवी मुंबई : सासू-सूनेच्या हत्येप्रकरणी दोन आरोपींना अटक

Thursday, 12 October 2017 11:12 PM

पनवेल तालुक्यातील नांदगाव येथील सासू-सून हत्याकांडाप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. 10 ऑक्टोबरला सिताबाई खुटले आणि अपर्णा खुटले या सासू सूनेची भर दुपारी धारदार शस्त्राने गळा चिरुन हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी सतिश खुटले आणि राजन उदरे यांना अटक केली आहे. जमिनीच्या वादातून हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला.

LATEST VIDEO