नवी मुंबई : जिल्हा काँग्रेस कमिटी सरचिटणीस सुधीर पवार यांच्यावर खंडणीचा गुन्हा

17 Oct 2017 11:21 AM

नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सुधीर पवार यांच्यावर दीड कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सुधीर पवार यांच्यावर पालिकेच्या शिक्षण विभागाच्या ठेकेदाराकडून दीड कोटींची खंडणी मागीतल्याचा आरोप आहे. सुधीर यांच्याबरोबर त्यांचे इतर दोन साथीदार रवी मदन आणि संतोष काळे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयाने या तिघांचा अटकपूर्व जामीनही फेटाळला. त्यामुळे आता या तीनही आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे. पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश पुरवठा करण्याचा रेडस्टार कंपनीकडे ठेका आहे. कंपनीचे मालक जयंतीलाल राठोड यांच्याकडे पवार आणि त्यांच्या साथीदारांनी खंडणी मागीतल्याचा आरोप आहे.

LiveTV