नवी मुंबई : पाईप गॅसचा स्फोट होऊन 3 गंभीर जखमी

16 Oct 2017 10:36 AM

पाईपलाईन लिकेजमुळे स्फोट होऊन तीन जण जखमी झाले आहेत. नवी मुंबईतील कोपरखैरणे सेक्टर 19 मधील श्री रामकृष्ण अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली. पाईपलाईन लिकेज चेकिंग करताना रात्री अचानक स्फोट झाला. या स्फोटात 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर वाशी मनपा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये एका महिलेचा आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. नरेश चौधरी ,शिवा देशमुख,सीमा नायर अशी जखमींची नावे आहेत. जखमींच्या तोंडाला,हाताला गंभीर दुखापत झाली आहे. जखमींमधील नरेश चौधरी हे गॅस पाईपलाईन रिपेरिंग मॅकेनिक आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV