नवी मुंबई : लोकल ट्रेनमध्ये युवतीला लुटून खाली फेकलं, जुईनगर स्थानकाजवळचा प्रकार

03 Dec 2017 11:12 PM

लोकल ट्रेनमधील महिला सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी एक बातमी. ऋतूजा बोडके या 19 वर्षीय मुलीला काल रात्री 11.30 वाजता लुटून ट्रेन मधून फेकण्याचा प्रकार घडला आहे. नेरूळ - जुईनगर दरम्यान लेडिज डब्यात प्रवास करणाऱ्या ऋतूजाला लुटण्यात आलंय. यावेळी सदर इसमाला विरोध करणाऱ्या ऋतूजाला आरोपीने ट्रेनमधून खाली ढकलून दिलं. तसंच तिचा मोबाईल, पर्स आणि कानातील रिंगा चोरून नेल्या. यावेळी ट्रेन जुईनगर रेल्वे स्थानकात प्रवेश करीत होती. ट्रेनची वेग कमी झाल्याने खाली पडलेल्या ऋतूजाला गंभीर दुखापत झाली नाही. मात्र तिच्या डोक्याला मार लागला असून तिला वाशीच्या एमजीएम रूग्णालयात दाखल करण्यात आलंय, तिच्यावर उपचार सुरु आहेत. आरोपी सी-वूड स्थानकापासून सदर तरुणीचा पाठलाग करत होता, अशी माहिती समोर येतेय. अधिक तपास सुरु आहे.

LATEST VIDEOS

LiveTV