नवी मुंबई : पामबीचवर विनापरवाना खोदकाम, झाडांची मोठी कत्तल

29 Nov 2017 01:06 PM

नवी मुंबईच्या पामबीचवर एनआरआय कॉम्पेक्सशेजारील विस्तीर्ण जागेवर खोदकाम सुरू करण्यात आलंय. यासाठी मोठ्याप्रमाणावर झाडांची कत्तल करण्यात आली. सिडकोच्या जागेवर कुठल्याही प्रकारचं बांधकाम करायचं असल्यास तशी परवानगी घ्यावी लागते. मात्र परवानगी नसताना सदरचा प्रकार सुरू असल्याचा आरोप भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे विना परवानगी खोदकाम करणे, झाडांची कत्तल करणे आणि खाडीमध्ये भराव टाकून तिवारांची झाडे नष्ट कणाऱ्य़ा भूमाफियांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येतेय. पालिकेने विना परवानगी झाडे तोडल्याप्रकरणी मिस्त्री कंन्स्ट्रक्शन कंपनीवर एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय.

LiveTV