नवी मुंबई : आरटीओकडून खारघरमधील रिक्षाचालकांवर कारवाई

08 Dec 2017 02:45 PM

18 दिवसांपासून सुरु असलेल्या खारघरच्या रिक्षाचालकांच्या मुजोरीला लगाम बसण्याची चिन्हं आहेत. खारघरमधील संपकरी रिक्षाचालकांच्या तपासाची मोहीम पनवेल आरटीओनं सुरु केली आहे. विनापरवाना रिक्षा, ड्रेसकोड नाही असे रिक्षाचालक, मीटरप्रमाणं भाडं न आकारणाऱ्या रिक्षाचालकांवर पनवेल आरटीओच्या वतीने कारवाई सुरु आहे. 'एबीपी माझा'च्या पाठपुराव्यानंतर पनवेल आरटीओने जागं होऊन आजच्या कारवाईला सुरुवात केली आहे. तसंच ज्या रिक्षा संपात सहभागी झाल्यात त्यांचा परवाना रद्द करण्याच्या नोटीसही बजावण्यात आली आहे. 

LATEST VIDEOS

LiveTV