नवी मुंबई : खारघरमध्ये 17 दिवसांपासून रिक्षा बंद, प्रवाशांचे हाल

07 Dec 2017 12:51 PM

तब्बल 17 दिवसानंतरही खारघरमधील रिक्षावाल्यांचा वाद मिटण्याची कुठलीही चिन्हं दिसत नाहीत. तळोजा आणि खारघरमधील हद्दीच्या आणि पार्किंगच्या वादातून 21 नोव्हेंबरला दोन्ही रिक्षा संघटनांमध्ये हाणामारी झाली. त्यानंतर रिक्षा वाहतूक बंद करण्यात आलीय. दोन वेळा आरटीओनं यांच्यात समेट घडवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात यश आलं नाही. गेल्या 15 दिवसापासून रिक्षा बंद असल्यानं लोकांचे अतोनात हाल होतायत. तळोजा आणि परिसरातून खारघरला येणाऱ्यांना बसची वाट पाहण्याशिवाय पर्याय नसतो. शिवाय लहान मुलं, महिला, वृद्ध आणि आजारी लोकांनाही पायपीट करण्याशिवाय पर्याय उरत नाही.

LATEST VIDEOS

LiveTV