नवी मुंबई : खड्ड्यामुळे तरुणीचा मृत्यू, रस्त्याच्या दूरवस्थेचं वास्तव उघड

16 Oct 2017 11:39 AM

नवी मुंबईच्या खारघर सेक्टरमध्ये घडलेल्या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. या दृश्याने फक्त अपघातच नव्हे तर नवी मुंबईतल्या रस्त्याच्या दूरवस्थेचं वास्तव समोर आणलं आहे. खारघर सेक्टर 12 मध्ये राहणारी शिल्पा पुरी दुचाकीवरुन जात होती. खड्ड्यामुळे तोल गेल्याने ती खाली पडली. यावेळी रस्त्यावरुन जाणाऱ्या क्रेनने तिला चिरडलं. या भीषण अपघातात शिल्पाचा जागीच मृत्यू झाला. 

LATEST VIDEOS

LiveTV