नवी मुंबई : सलग तीन दिवसांच्या मेगाब्लॉकमुळे हार्बर रेल्वेवरील प्रवाशांचे हाल

23 Dec 2017 12:09 PM

नवी मुंबईकरांसाठी पुढचे तीन दिवस हार्बर रेल्वे वाहतूकही विस्कळीत असणार आहे..कारण हार्बर रेल्वे मार्गावरील पनवेल ते नेरुळ दरम्यान आजपासून तीन दिवस मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. उरण-बेलापूर या रेल्वेमार्गाच्या कामासाठी हा तीन दिवसांचा मेगाब्लॉक असेल. त्यामुळे चाकरमान्यांना स्वतःच्या वाहनानं ठाणे-मुंबई गाठावं लागणार आहे. नेरुळ ते ठाणे हा ट्रान्सहार्बर मार्ग चालू राहील. पण पनवेल ते सीवूड्स-दारावे या स्टेशनवरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मुंबई किंवा ठाण्याला जायचं असेल तर नेरुळला यावं लागणार आहे.

LATEST VIDEOS

LiveTV