नवी मुंबई : भुयार खोदून बँक ऑफ बडोदामधून कोट्यवधींची लूट

13 Nov 2017 03:15 PM

जमिनीखालून भुयार खोदून बँक ऑफ बडोद्याच्या शाखेत दरोडा टाकण्याचा धक्कादायक प्रकार नवी मुंबईत घडला आहे. यात करोडो रुपये दरोडेखोरांनी लुटल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. नवी मुंबईच्या जुईनगर सेक्टर 11 मध्ये मध्यरात्री ही घटना घडली. दरोडेखोर फरार असून सीसीटीव्हीच्या आधारे काही सुगावा लागतो का याचा शोध सुरु आहे. मात्र चक्क भुयार खोदून बँकेची लूट केल्याने पोलिसही थक्क झाले आहेत. 

LATEST VIDEOS

LiveTV