नवी मुंबई : आवक घटल्याने भाजीपाल्याचे दर 25 टक्क्यांनी वाढले

23 Oct 2017 02:30 PM

भाजीपाल्याची आवक कमी झाल्यानं मुंबईमध्ये भाज्यांच्या दरात 25 टक्क्यांची वाढ झाली आहे. सततच्या पावसाने भाजीपाला पिकाचं नुकसान झालं आहे. त्यामुळे नवी मुंबईच्या बाजार समितीमध्ये भाज्यांची आवक रोडावली आहे. त्यामुळे दरात वाढ झाली असून, किरकोळ बाजारात ही वाढ जास्त होण्याची शक्यता आहे. नवी मुंबईतल्या भाजीपाल्याच्या दरांचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनायक पाटील यांनी.

LATEST VIDEOS

LiveTV