नवी मुंबई : हार्बर मार्गावर दोन दिवसांचा मेगाब्लॉक, महिला प्रवाशांच्या प्रतिक्रिया

27 Dec 2017 12:42 PM

हार्बर मार्गावरील लोकल प्रवाशांना आज (27 डिसेंबर) आणि उद्याही (28 डिसेंबर) मनस्ताप सहन करावा लागणार आहे. कारण हार्बर लाईनवर दोन दिवसांचा तातडीचा विशेष मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.

बेलापूर स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर दुरुस्तीचं काम सुरु आहे. त्यामुळे हा विशेष मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. या मेगाब्लॉकमुळे काही लोकल गाड्या रद्द होण्याची शक्यता आहे. तर काही गाड्या उशिराने धावणार आहेत.

खरंतर मागील चार ते पाच दिवसांपासून हार्बर मार्गावरील प्रवाशांना या ना त्या कारणामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. उरण मार्गाच्या नुतनीकरणासाठी घेतलेल्या मेगाब्लॉकमुळे नेरुळ ते पनवेल ही सेवा पूर्णपणे ठप्प होती. पण ही सेवा सोमवारी रात्री सुरु झाली.

LATEST VIDEOS

LiveTV