नवी मुंबई : मोबाईल-पर्स खेचून तरुणीला धावत्या ट्रेनमधून फेकलं

04 Dec 2017 11:54 PM

लोकलमधील महिला सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. नवी मुंबईत धावत्या लोकलमधून तरुणीला फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  ऋतुजा बोडके ही 19 वर्षीय तरुणी परवा रात्री साडेअकरा वाजता नेरुळ-जुईनगर दरम्यान महिला डब्यातून प्रवास करत होती. याचवेळी आरोपी महिला डब्यात चढला आणि ऋतुजाला लुटण्याचा प्रयत्न त्याने केला. आरोपीनं ऋजुताचा मोबाईल, पर्स हिसकावून घेतले. कानातले रिंग ओढताना ऋतुजा आणि चोरट्यामध्ये झटापट झाली. यात आरोपीने रिंग खेचत ऋतुजाला ट्रेनमधून धक्का दिला. ऋतुजाच्या डोक्याला लागलं असल्याने तिच्यावर वाशीच्या एमजीएम रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. दरम्यान आरोपी महिला डब्यात शिरतानाची दृश्यं सीसीटीव्हित कैद झाली आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV