नवी मुंबई : खारघरमध्ये गेल्या 8 दिवसांपासून रिक्षा बंद, प्रवाशांना नाहक मनस्ताप

28 Nov 2017 11:03 AM

गेल्या 7 दिवसांपासून खारघरमध्ये रिक्षाचालक संपावर गेले आहेत. गेल्या आठवड्यात रिक्षा चालकांच्या दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीत खारघर रिक्षाचालकांना पोलिसांनी अटक केली होती, त्याविरोधात खारघरमधल्या 800 रिक्षाचालकांनी बंद पाळला. या हाणामारीत तळोजा रिक्षाचालकांनी दगडफेक करून मारहाण केली असतानाही खारघर रिक्षाचालकांना अटक करण्यात आल्यानं रिक्षाचालक आक्रमक झाले आहेत. जोपर्यंत अटक करण्यात आलेल्या रिक्षाचालकांना जामीन मिळत नाही तोपर्यंत हा संप मागे घेणार नसल्याचं रिक्षा युनियनकडून देण्यात आली आहे. दरम्यान गेल्या 7 दिवसांपासून रिक्षा बंद असल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला.

LATEST VIDEOS

LiveTV