यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल मोर्चाला सुरुवात

01 Dec 2017 07:45 PM

यवतमाळ ते नागपूर राष्ट्रवादीच्या हल्लाबोल पदयात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. 153 किलोमीटर अंतराची पदयात्रा 12 डिसेंबरला नागपूरमध्ये पोहोचणार आहे. यवतमाळच्या समता मैदानात सभा पार पडल्यानंतर या पदयात्रेला सुरुवात झाली. या हल्लाबोल आंदोलनात अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे यांसह राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते या आंदोलनात सहभागी झाले होते. या पदयात्रेद्वारे सरकारविरोधी आवाज बुलंद करण्याचा निर्धार राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व्यक्त केला.

LATEST VIDEOS

LiveTV