नवी मुंबई : दशक्रिया सिनेमा पाहणाऱ्यांना 'ज्युली-2' सिनेमाचं तिकीट

01 Dec 2017 06:51 PM

दशक्रिया चित्रपट पहायला गेलेल्या प्रेक्षकांना ज्युली टू ची तिकीटं दिल्याचा प्रकार नेरुळमध्ये उघडकीस आला आहे. नेरूळच्या मॅक्स मल्टिप्लेक्समध्ये दशक्रिया चित्रपट पाहायला गेलेल्यांना 'ज्युली टू'चं तिकिट देण्यात आलं. खरंतर दशक्रिया या चित्रपटासाठी त्यांनी पैसे मोजले त्यांना तोच चित्रपट पाहायलाही मिळाला. पण गल्ला जमा झाला ज्युली 2 या चित्रपटाच्या नावावर. त्यामुळे मराठी चित्रपटांच्या नावे जमा होणारा गल्ला थेट हिंदी चित्रपटांचा जातो का? असा सवाल उपस्थित झाला आहे.

LATEST VIDEOS

LiveTV