नवी दिल्ली : संसदेवरील हल्ल्याला 16 वर्ष पूर्ण

13 Dec 2017 03:48 PM

संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या संसदेवरील दहशतवादी हल्ल्याला आज १६ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अन्य मंत्री आणि काँग्रेच्या बड्या नेत्यांनी या हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहिली. १३ डिसेंबर २००१ ला लष्कर-ए-तोयबा आणि जैस-ए-मोहम्मदच्या पाच दहशतवाद्यांनी संसदेवर हल्ला केला होता. या हल्ल्यात दिल्ली पोलिसांचे ६ जवान आणि संसदेचे दोन गार्ड शहीद झाले होते.

LATEST VIDEOS

LiveTV