नवी दिल्ली : 93 हजार पाक सैनिकांना शरण आणणारा भारताचा विजय दिवस!

16 Dec 2017 10:57 AM

देशाभिमान उंचावणारा आजचा दिवस आहे. 16 डिसेंबर 1971 साली भारताने पाकिस्तानला युद्धात हरवलं होतं. त्या दिवसाला आज 46 वर्षे पूर्ण झाली आहेत. या युद्धात भारताच्या तब्बल चार हजार सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. तर दहा हजार सैनिक जखमी झाले होते. याचीच आठवण म्हणून आज देशभर हा दिवस साजरा केला जातो. विजय दिवसाला दिल्लीतल्या इंडिया गेटवर अमर जवान ज्योतीला पंतप्रधानांसह राष्ट्रपती सलामी देतात आणि युद्धातील शहीदांना श्रद्धांजली वाहतात.

LATEST VIDEOS

LiveTV