नवी दिल्ली : विजय रुपाणी पुन्हा गुजरातचे मुख्यमंत्री, अरुण जेटलींची माहिती

22 Dec 2017 08:39 PM

पक्षाच्या बैठकीत विचारमंथन झाल्यानंतर पुन्हा एकदा विजय रुपाणी यांची गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून, तर उपमुख्यमंत्री म्हणून नितीन पटेल यांची वर्णी लागली आहे. गांधीनगर येथील पक्षाच्या कार्यालयात याबाबत निर्णय झाला.

नुकत्याच झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने 182 पैकी 99 जागांवर विजय मिळवत बहुमत मिळवलं आहे. एका अपक्ष आमदारानेही भाजपला पाठिंबा दिल्याने हा आकडा आता 100 झाला आहे. केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या उपस्थितीत आमदारांची बैठक झाली. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोण असेल, हे जाहीर करण्यात आलं.

LATEST VIDEOS

LiveTV