नवी दिल्ली : भूतानचे राजा जिग्मे खेसर वांगचुक भारताच्या दौऱ्यावर

01 Nov 2017 03:45 PM

भारताच्या शेजारी असलेल्या भूतानचे राजा जिग्मे खेसर नामग्येल वांगचुक कालपासून 4 दिवसांच्या भारत भेटीवर आले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी जेत्सुन पेमा वांगचुक आणि राजकुमार जिग्मे नामग्येल वांगचुकही उपस्थित आहेत. काल परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी स्वत: विमानतळावर उपस्थित ऱाहून भूतानच्या राजा-राणीचं स्वागत केलं. यावेळी राजकुमार जिग्मे नामग्येल वांगचुक मात्र उपस्थितांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय. दरम्यान राजकुमाराचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय दौरा असल्याचं बोललं जातंय.
डोकलामच्या रस्ते निर्माणावरुन भारत आणि चीनमध्ये हल्लीच वाद झाला होता. त्यावेळी भूताननं भारताची साथ दिली होती. त्यामुळे भूतानच्या राजांची भारतभेट महत्वाची ठरते आहे.

LATEST VIDEOS

LiveTV