नवी दिल्ली : राजधानीत आज देशभरातील शेतकऱ्यांचा एल्गार, 162 संघटनांचं आंदोलन

20 Nov 2017 11:51 AM

देशभरातील शेतकरी आज राजधानी दिल्लीत धडकणार आहेत. शेतमालाचा हमीभाव, कर्जमुक्ती, शेतीचं धोरण, शाश्वत शेतीची खात्री, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी इत्यादी प्रमुख मागण्या घेऊन शेतकरी दिल्लीत मोर्चा काढणार आहेत.

या आंदोलनाच्या निमित्ताने देशातील 162 शेतकरी संघटना पहिल्यांदाच एकत्र येत आहेत. सुमारे दहा लाख शेतकरी आंदोलनात सहभागी होणार असल्याचा दावा संघटनांनी केला होता.

अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या (एआयकेएससीसी) अध्यक्षतेखाली देशातील शेतकरी या दोन दिवसीय आंदोलनात सहभागी होणार आहेत. शेतकरी आज सकाळी दहा वाजता रामलीला मैदानातून पदयात्रा करत संसद मार्गावर पोहोचतील आणि त्यानंतर तिथे 11.30 वाजता सभा होईल.

LATEST VIDEOS

LiveTV