नवी दिल्ली : 177 वस्तूंवरील जीएसटी 28 टक्क्यांवरुन 18 वर

10 Nov 2017 08:24 PM

जीवनावश्यक 177 वस्तूंवरील कर 28 टक्क्यांवरुन कमी करत 18 टक्क्यांवर करण्यात आला आहे. त्यामुळे आता 28 टक्के कर केवळ 50 वस्तूंवरच असेल. 28 टक्के कर असलेल्या वस्तूंमध्ये केवळ चैनीच्या आणि लक्झरी वस्तूंचा समावेश असेल. जीएसटी परिषदेच्या निर्णयानंतर आता च्युइंगम, चॉकलेट्स, आफ्टर शेव्ह, डिओडरंट, वॉशिंग पावडर, डिटर्जंट, मार्बल अशा वस्तूंवरील कर कमी झाला आहे. जीएसटीची दोन दिवसीय बैठक गुवाहाटीमध्ये झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला.

LATEST VIDEOS

LiveTV