नवी दिल्ली : आयर्न लेडी इंदिरा गांधींची आज पुण्यतिथी, राहुल गांधी आणि मनमोहन सिंहाकडून श्रद्धांजली

31 Oct 2017 11:21 AM

भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज 33 वी पुण्यतिथी. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी नवी दिल्लीतील शक्ती स्थळावर जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली.
31 ऑक्टोबर 1984 साली इंदिरा गांधींची त्यांच्याच सुरक्षारक्षकाकडून हत्या करण्यात आली होती. पंतप्रधान पदासोबतच संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्रींसारख्या अनेक पदांचा त्यांनी कार्यभार सांभाळला. त्यांच्या उत्तम नेतृत्वामुळे त्यांना भारताची आयर्ऩ लेडी संबोधलं जायचं.

LATEST VIDEOS

LiveTV