गुजरात निवडणूक निकाल : हा विजय विकासाचा, देश बदलासाठी तयार : नरेंद्र मोदी

19 Dec 2017 10:12 AM

''गुजरातमध्ये भाजपने मिळवलेला हा अभूतपूर्व विजय आनंद द्विगुणित करणारा आहे. भाजपची सत्ता आल्याचा तर आनंद आहेच, मात्र गेल्या साडे तीन वर्षांपासून म्हणजे मी जेव्हा गुजरात सोडलं, तेव्हापासून भाजपच्या कार्यकर्त्यांनी राज्य समर्थपणे सांभाळलं असल्याचा आनंद होत आहे'', असं मोदी म्हणाले. ''भाजपचा पराभव करण्यासाठी वाट्टेल ते प्रयत्न करण्यात आले. काँग्रेसने जातीय विष पेरण्याचा प्रयत्न केला. मात्र गुजरातच्या जनतेने हे नियोजन यशस्वी होऊ दिलं नाही. जनतेने आणखी जागरुक होण्याची गरज आहे'', असंही मोदी म्हणाले.

LATEST VIDEOS

LiveTV