नवी दिल्ली : सोयाबीन तेलाच्या आयातीवर शुल्कवाढीचा प्रस्ताव, पाशा पटेलांशी बातचित

03 Nov 2017 11:39 AM

यंदा सोयाबीनचं विक्रमी उत्पन्न झालं. पण शेतकऱ्यांना चांगला दर मिळत नाही. यासंदर्भात एक महत्वाची बैठक केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या अध्यक्षतेखाली काल दिल्लीत पार पडली. कृषीमंत्री राधामोहन सिंह, अन्न आणि पुरवठा मंत्री रामविलास पासवान हे ही या बैठकीला उपस्थित होते. शेतकऱ्यांना दर मिळायचा असेल तर आधी देशात भरमसाठ आयात होणाऱ्या पामतेलात कपात व्हायला पाहिजे. त्यासाठी तेलाच्या आयातीवरचं शुल्क वाढवून ते 35 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची शिफारस या बैठकीत करण्यात आली.

LATEST VIDEOS

LiveTV