नवी दिल्ली : पंतप्रधान पदासाठी 2004 साली माझ्यापेक्षा प्रणव मुखर्जी पात्र होते : मनमोहन सिंह

14 Oct 2017 11:06 AM

माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी आपल्या एका वक्तव्यानं सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. ‘2004 साली सोनिया गांधींनी माझी पंतप्रधानपदी निवड केली. पण माझ्यापेक्षा प्रणव मुखर्जी हे त्या पदासाठी अधिक योग्य होते.’ असं वक्तव्य मनमोहन सिंह यांनी करताच उपस्थितांच्याही भुवया उंचावल्या.

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या ‘द कोलिशन इयर्स 1996-2012’ या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी ते बोलत होते. काल (शुक्रवार) पार पडलेल्या या सोहळ्याला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी हे देखील उपस्थित होते.

LATEST VIDEOS

LiveTV