नवी दिल्ली : पाकिस्तानी माध्यमांचा घृणास्पद चेहरा पुन्हा समोर

27 Dec 2017 11:48 PM

पाकिस्तानचा घृणास्पद चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. कुलभूषण जाधवांच्या कुटुंबीयांना अपमानास्पद वागणूक देण्याची पाकिस्ताननं एकही संधी गमावली नाही. कुलभूषण जाधवांच्या भेटीनंतर बाहेर आलेल्या आई-पत्नीला माध्यमांच्या घृणास्पद वागणुकीला समोर जावं लागलं. परिस्थितीच्या घेऱ्यात अडकलेल्या आई-पत्नीच्या मागे पाकिस्तानी मीडियानं लावलेला ससेमिरा कॅमेऱ्यात कैद झाला. धक्कादायक म्हणजे, अपने कातील बेटे से मिलने के बाद आपके क्या जजबात हैं? अशा प्रकारचे प्रश्न पाकिस्तानी माध्यमांच्या प्रतिनिधींनी कुलभूषण यांच्या कुटुंबीयांना विचारले.

LATEST VIDEOS

LiveTV