नवी दिल्ली : गुजरातच्या जनतेने मोदींना धडा शिकवला : राहुल गांधी

19 Dec 2017 02:30 PM

मोदींचं गुजरातच्या विकासाचं म़ॉडेल फक्त दिखावा असल्याची टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. सुरुवातीला गुजरातला गेल्यावर आम्ही लढू शकणार नाही, असं म्हटलं जायचं. मात्र, गुजरातचा निकाल आमच्यासाठी चांगला असून, या निकालाचं आम्ही स्वागत करतो, असंही राहुल म्हणाले. गुजरातचा निकाल लागल्यानंतर प्रथमच राहुल गांधी माध्यमांना सामोरे गेले. विरोधक कितीही पैसेवाला आणि रागीट असला तरी प्रेमाने त्याला हरवता येतं, हेच गुजरात निवडणुकीने शिकवलं, असंही राहुल यांनी म्हटलं. जय शहाच्या मुद्द्यावरुनही त्यांनी भाजपवर टीका केली.

LATEST VIDEOS

LiveTV