नवी दिल्ली: राहुल गांधी आज काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारणार

16 Dec 2017 09:48 AM

काँग्रेसमध्ये आता काही वेळातच राहुलपर्वाला सुरुवात होणारय. मावळत्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडून राहुल गांधी पक्षाध्यक्ष पदाची सूत्रे स्विकारतील. दरम्यान, या कार्यक्रमासाठी काँग्रेस मुख्यालयात मोठी तयारी करण्यात आलीय. विविध राज्यांतून काँग्रेसचे कार्यकर्ते काँग्रेस मुख्यालयात दाखल झाले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचे अध्यक्षपद राहुल यांच्याकडे सोपविण्याची मागणी पक्षातील नव्या पिढीतून करण्यात येत होती. गुजरात निवडणुकीत राहुल गांधी स्वत:ची प्रतिमा वदलण्यात यशस्वी ठरल्याचं काँग्रेस नेत्यांच मत आहे. काँग्रेसमध्ये सर्वाधिक काळ अध्यक्षपदाची धुरा सांभाळणाऱ्या सोनिया गांधी पुढे पक्षाच्या मार्गदर्शक म्हणून काम करणार असल्याची माहिती काँग्रेस नेत्यांनी दिलीय.

LATEST VIDEOS

LiveTV