जीएसटी अर्ध्या रात्री लागू करता, मग अधिवेशन का लांबवलं? : सोनिया गांधी

20 Nov 2017 05:42 PM

देशात जीएसटी लागू करण्यासाठी मध्यरात्री पंतप्रधान मोदी संसदेच्या सभागृहात येतात. पण अधिवेशनात विरोधकांचा सामना करण्याचे धाडस पंतप्रधानांमध्ये नाही, असं म्हणत सोनिया गांधींनी मोदींवर हल्ला चढवला. काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीला संबोधित करताना सोनिया गांधीही मोदी सरकारचा चांगलाच समाचार घेतला.

सोनिया गांधी म्हणाल्या की, “ सध्या संसदेच्या परंपरेवर टीका केली जाते. पण संसदेच्या पटलावरुन जनेचे प्रश्न उपस्थित करण्याचे महत्त्वाचे व्यासपीठ आहे. पण सध्या संसदीय परंपरा आणि लोकशाहीची हत्या केली जात आहे. भ्रष्टाचारापासून ते डिफेंस डीलवरुन सरकारने उत्तरं दिली पाहिजेत. पण सरकार यापासून स्वत:चा बचाव करत आहे. त्यासाठीच हिवाळी अधिवेश लांबवलं जात आहे.”

LATEST VIDEOS

LiveTV