नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत शहजाद पुनावाला यांच्याशी खास बातचित

04 Dec 2017 09:54 PM

काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधींची बिनविरोध निवड ही जवळपास निश्चित झालीय. कारण अध्यक्षपदासाठी राहुल गांधींच्या विरोधात कोणत्याही काँग्रेस नेत्यानं अर्ज दाखल केला नाही. आज माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, सुशीलकुमार शिंदे आणि इतर दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत राहुल गांधींनी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी राहुल गांधींच्या समर्थनार्थ 89 नेत्यांनी प्रस्ताव सादर केला तर त्याला एकूण 890 नेत्यांनी अनुमोदन दिलं. दरम्यान गेली 19 वर्षे काँग्रेसच्या अध्यक्षपदी सोनिया गांधी विराजमान आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV