नवी दिल्ली : गुजरातच्या विमानांसाठी टाईमस्लॉट, महाराष्ट्र वाऱ्यावर?

26 Oct 2017 02:51 PM

गुजरातमधल्या विमानांना उड्डाण आणि लँडिगसाठी टाईम स्लॉट देऊन महाराष्ट्रातली शहरं वाऱ्यावर सोडली जात असल्याचा आरोप करत दिल्लीत शिवसेनेचे खासदार आक्रमक झाले आहेत. यावरुन हवाई वाहतूक मंत्रालयाविरोधात आज शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांनी मोर्चा काढला. पंतप्रधान मोदींच्या उडाण योजनेतंर्गत महाराष्ट्रातल्या नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, नांदेड, जळगाव अशा शहरांमधून मुंबईपर्यंतची विमानसेवा सुरु करण्याचा मानस आहे. मात्र, फक्त मुंबई विमानतळावर विमानं उतरवण्यासाठी स्लॉट मिळत नसल्याच्या कारणावरुन ही योजना बासनातच असल्याचा आरोप केला जात आहे

LATEST VIDEOS

LiveTV