नवी दिल्ली : सोनिया गांधींच्या निवृत्तीच्या वृत्तावर खा. रजनी पाटील यांची प्रतिक्रिया

15 Dec 2017 03:36 PM

सोनिया गांधी राजकारणातून नव्हे तर काँग्रेस अध्यक्षपदापासून दूर होतायत, असं स्पष्टीकरण काँग्रेसनं जाहीर केलं आहे. आज हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सोनिया संसदेत आल्या. यावेळी राहुल गांधी अध्यक्ष झाल्यानंतर तुमचा पक्षात नेमका काय रोल असेल? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर सोनियांनी आता मी रिटायर होतेय, असं उत्तर दिलं. काँग्रेस जनांनी मात्र सोनिया निवृत्त होणार नाहीत, असं म्हटलं आहे. काँग्रेस नेत्या रजनी पाटील यांनी आई कधी रिटायर होत नसते, असं म्हणत सोनियांच्या काँग्रेसमधील स्थानाला आधोरेखित केलंय. 

LATEST VIDEOS

LiveTV