नवी दिल्ली: तात्काळ तलाक प्रतिबंधक विधेयक आज लोकसभेत

28 Dec 2017 10:39 AM

तात्काळ तिहेरी तलाक प्रतिबंधक विधेयक लोकसभेत मांडलं जाणार आहे. कायदामंत्री रविशंकर प्रसाद हे विधेयक लोकसभेत मांडतील. त्यासाठी सर्व भाजप खासदारांनी लोकसभेत उपस्थित रहावं, असा व्हिप पक्षानं काढलाय. सुप्रीम कोर्टानं ऑगस्ट महिन्यात तिहेरी तलाकला बेकायदेशीर ठरवलं होतं.  तिहेरी तलाक प्रतिबंधक कायदा तुम्ही आणणार का, आणलात तर ते बरं होईल, असं कोर्टानं सुचवलं होतं. या विधेयकानुसार, तोंडी तलाक देणं अजामीनपात्र गुन्हा ठरणार आहे, ज्यामध्ये जास्तीत जास्त ३ वर्षांची शिक्षा होऊ शकते.

LATEST VIDEOS

LiveTV