मुंबई-हजरत निझामुद्दीन नवी राजधानी एक्स्प्रेस, 16 ऐवजी 14 तासात प्रवास शक्य

14 Oct 2017 12:21 PM

मुंबई ते दिल्लीचा प्रवास आता आणखी जलद होणार आहे. कारण मुंबई ते हजरत निजामुद्दीन ही नवीन राजधानी एक्स्प्रेस पुढच्या आठवड्यापासून सुरु करण्यात येणार आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर ही गाडी चालवली जाईल. त्यानंतर प्रवाशांचा प्रतिसाद पाहून ही गाडी सुरळीत सुरु होईल. आठवड्यातून ३ वेळा ही गाडी मुंबईतून सोडली जाणार आहे. सध्याच्या राजधानी एक्प्रेसनं मुंबई ते दिल्ली प्रवासासाठी 16 तास लागतात, मात्र या जलद गाडीमुळं तुम्ही 14 तासात दिल्लीला पोहचू शकता. 130 किलोमीटर प्रतितासाच्या वेगानं ही गाडी धावणार आहे. या गाडीचं तिकिटही माफक ठेवण्यात आलं. 

LATEST VIDEOS

LiveTV