मुंबई : परीक्षेला उशिरा येणाऱ्यांना परीक्षागृहात नो एन्ट्री, राज्य सरकारचा नवा नियम

30 Nov 2017 08:48 PM

राज्य शिक्षणमंडळानं दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक नवीन नियम केला आहे. परीक्षेसाठी आता एक मिनिटही उशीर झाला तरी विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येणार नाही तसंच परीक्षेवेळी परीक्षागृहात पूर्ण वेळ बसण्याची सक्तीही विद्यार्थ्यांना करण्यात आली आहे. त्यामुळे झटपट परीक्षा देऊन पळ काढणाऱ्या विद्यार्थ्यांनाही आता परीक्षा संपेपर्यंत परीक्षा खोलीत बसून राहावं लागणार आहे.परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी मंडळाने हा निर्णय घेतला आहे.

LATEST VIDEOS

LiveTV