नववर्षाच्या स्वागतासाठी ऑकलंड, सिडनीतलं आकाश फटाक्यांच्या आतषबाजीनं उजळलं

01 Jan 2018 08:39 AM

नवीन वर्षाचं सर्वात पहिलं स्वागत न्यूझीलंडमध्ये मोठ्या उत्साहात झालं. ऑकलंडच्या स्काय टॉवरवर नयनरम्य रोशनाई आणि आतषबाजी करून 2018 चं स्वागत करण्यात आलं. स्काय टॉवरवर लावलेल्या भल्या मोठ्या घड्याळामध्ये रात्री बारा वाजल्यानंतर तुफान आतषबाजीला सुरुवात झाली. सर्वात पहिल्या नववर्षाचं स्वागत करण्यासाठी जगभरातील पर्यटकांनी न्यूझीलंडमध्ये धाव घेतली. न्यूझीलंड पाठोपाठ ऑस्ट्रेलियातील सिडनीत देखील नववर्षाचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. सुप्रसिद्ध सिडनी हार्बर ब्रिजवर आणि ऑपेरा हाऊस परिससरात नववर्षानिमित्त फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली होती. त्यानंतर दक्षिण कोरियातील सेउल शहरात नववर्षाचं उत्साहात स्वागत करण्यात आलं.

LATEST VIDEOS

LiveTV