नवी दिल्ली: पीएफसह छोट्या बचत योजनांच्या व्याजदरात कपात

28 Dec 2017 10:42 AM

भविष्य निर्वाह निधीसह अन्य छोट्या बचत योजनांवरील व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेत, केंद्र सरकारनं छोट्या गुंतवणुकदारांना मोठा झटका दिलाय. यात नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, सुकन्या योजना, किसान क्रेडीट कार्ड आणि भविष्य निर्वाह निधी सारख्या योजनांचा समावेश आहे. जानेवारी ते मार्च दरम्यान या योजनांमधील व्याजदरात शून्य पुर्णांक दोन टक्के कपात केली जाणार आहे. दरम्यान, ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या योजनांमधील व्याजदरात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. तसंच सेव्हिंग डिपॉजिटमध्ये कुठलेही बदल करण्यात आलेले नाहीत. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने या संदर्भात एक निवेदन जारी केलंय.

LATEST VIDEOS

LiveTV