उत्तर कोरिया : अमेरिकेच्या इशाऱ्यानंतरही उत्तर कोरियाकडून पुन्हा बॅलेस्टिक मिसाईलची चाचणी

29 Nov 2017 12:45 PM

उत्तर कोरियानं पुन्हा एकदा जपानच्या हवाई हद्दीतून समुद्रात बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागल्याने संपूर्ण जग हादरलं आहे.
यावर जपानसह अमेरिकेनं तीव्र शब्दात कोरियाला खडसावलं आहे.

काल मध्यरात्री उत्तर कोरियाने ही चाचणी केली. उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन यांनी या आधी सप्टेंबरमध्ये अशीच क्षेपणास्त्र चाचणी केली होती. उत्तर कोरियाच्या या कृत्याची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गंभीर दखल घेतली आहे. उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचणीनंतर 'बघून घेऊ', असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.

येत्या २०१८ पर्यंत उत्तर कोरिया अण्वस्त्र क्षेपणास्त्रे लॉन्च करण्यात सक्षम होईल असा दावा दक्षिण कोरियानं केला आहे. अत्याधुनिक क्षेपणास्त्रांची निर्मिती करण्यासाठी उत्तर कोरियाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV